Breaking News

शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता; फलटणमध्ये ६० शिक्षकांचा ‘आदर्श शिक्षक’ सन्मान

Teachers' Day celebrated at the Kolki Service Centre of the Brahma Kumaris Ishwariya Vishwa Vidyalaya.

ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कोळकी सेवा केंद्रात शिक्षक दिन उत्साहात 

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, कोळकी सेवा केंद्राच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ‘आदर्श शिक्षक सन्मान सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात एकूण ६० शिक्षक व शिक्षिकांचा, फलटण सेवा केंद्राच्या संचालिका डॉ. छाया दीदी यांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव करण्यात आला. प्रत्येक शिक्षकाला फुलांचे रोपटे, शाल, श्रीफळ, सुविचारांचा संग्रह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाली दीदी यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कार्याचा परिचय करून दिला. डॉ. छाया दीदी यांनी जीवनात मेडिटेशनचे महत्त्व विशद केले, तर अनिता दीदी यांनी उपस्थितांना मेडिटेशनची अनुभूती करून दिली.
या कार्यक्रमास प्राचार्य गंगावणे सर,लतिका आनपट, झणझणे मॅडम,  सहदेव गुरव, यादव वकील, नेवसे वकील यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

    ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या वतीने शिक्षकांचा सन्मान केल्याबद्दल गंगावणे सर आणि गुरव सर यांनी मनोगत व्यक्त करून, आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या दीदी यांनी केले.

    उपस्थितांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments