Breaking News

डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी फलटण शहर पोलिसांची जनजागृती रॅली; २५ शाळा-महाविद्यालयांचा सहभाग; ध्वनीप्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश

Phaltan City Police holds public awareness rally for DJ-free Ganeshotsav; 25 schools and colleges participate; Message of noise pollution-free Ganeshotsav

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१२ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषण टाळण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. फलटण नगरपरिषद हद्दीतील २५ शाळा व महाविद्यालयांच्या संयुक्त सहभागातून ही रॅली काढण्यात आली.

    गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याबरोबरच डीजेचा वापर टाळावा, असा संदेश रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला. ध्वनीप्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पर्यावरणपूरक व शांततामय पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

    रॅलीमध्ये विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक तसेच संबंधित प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीपर घोषणांच्या माध्यमातून ध्वनीप्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.

    ‘जनजागृती – सुरक्षित गणेशोत्सव – ध्वनीप्रदूषणमुक्त फलटण’ या उद्देशाने आयोजित या रॅलीतून गणेशोत्सव काळात ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले.

No comments