Breaking News

फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा; डॉ. अमित शेष यांची प्रमुख उपस्थिती

Teachers' Day celebrated with enthusiasm at Phaltan Education Society's College of Engineering; Dr. Amit Shesh was the chief guest

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण येथे शिक्षक दिन अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे चे रजिस्ट्रार डॉ. अमित शेष हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर यांनी भूषवले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी सर यांनी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

    शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांना उत्कृष्ट शैक्षणिक योगदानाबद्दल 'बेस्ट प्राचार्य पुरस्कार' प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व स्टाफ व प्रमुख पाहुणे रजिस्ट्रार डॉ. अमित शेष यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

    आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रजिस्ट्रार डॉ. अमित शेष यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना शैक्षणिक प्रगती, संशोधन व भावी आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बहुमोल सल्ला दिला. फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचलन रुजल दोशी व पूनम शेंडगे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डिन अकॅडमिक प्रा. शांताराम काळेल यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments