माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करा; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ : राज्यात, विशेषतः माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. या भेटीदरम्यान दुष्काळी परिस्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी परिस्थितीची माहिती दिली. दुष्काळाचा सामना करणाऱ्या भागांना दिलासा मिळावा आणि नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध व्हावी, यासाठी शासनस्तरावर तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

No comments