गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये ७ सप्टेंबरला बैठक; वेळ व ठिकाणात बदल
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे नियोजन, कायदा व सुव्यवस्था तसेच विविध आवश्यक बाबींवर चर्चा करण्यासाठी सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यापूर्वी ही बैठक सकाळी ११ वाजता सजाई मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र, आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार असल्याने बैठकीच्या वेळेत व ठिकाणात बदल करण्यात आला आहे. आता ही बैठक महाराजा मंगल कार्यालय येथे दुपारी ४ वाजता होणार आहे.
या बैठकीस फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच तहसीलदार अभिजीत जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी निखिल जाधव, फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ तसेच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ उपस्थित राहणार आहेत.
गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखणे, गणेश मंडळांच्या विविध अडचणी तसेच उत्सवाच्या नियोजनाबाबत या बैठकीत मार्गदर्शन व चर्चा करण्यात येणार आहे.
बैठकीस सर्व पत्रकार, नगरसेवक, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, ग्रामीण व शहरी भागातील सर्व पोलीस पाटील, गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments