'राजकारण गेलं चुलीत...!' – नंदकुमार मोरे यांची गंधवार्ता ग्रुपवरील अखेरची पोस्ट
'To hell with politics...!' – Nandkumar More's final post on the Gandhavarta group.
फलटण (ॲड.रोहित अहिवळे) दि. १९ जुलै २०२६ - सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि वेळोवेळी राजकारणातील घडामोडींवर स्पष्टपणे मत व्यक्त करणारे नंदकुमार मोरे यांचे आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
निधनापूर्वी काही तासांपूर्वी, रात्री १.४८ वाजता त्यांनी गंधवार्ता व्हॉट्सअॅप ग्रुपवर "राजकारण गेलं चुलीत...!!!" या आशयाची पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्रीराम सहकारी साखर कारखान्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे अभिनंदन करण्यात आले होते.
राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र येण्याचा संदेश देणारी ही पोस्ट त्यांच्या आयुष्यातील अखेरची सोशल मीडिया पोस्ट ठरली. आज सकाळी त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या या पोस्टची शहरात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नंदकुमार मोरे हे सामाजिक विषयांवर परखड भूमिका मांडणारे आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे फलटणच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
कालकथीत नंदकुमार मोरे यांनी रात्री 1.48 am वाजता पोस्ट केलेली पोस्ट...
राजकारण गेलं चुलीत....!!!
सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, कामगार वर्ग, व्यापारी व साखर उद्योगाशी संबंधित कोणाचीच चुल नाही आत्ता बंद पडणार....!!!
आत्ता नवं सूत्र.. सहकार केंद्रस्थानी...!!
सहकारी संस्थानी राजकारणापासून अलिप्त राहणे केवळ अशक्य आहे,असे नसून ते धोकादायक आहे. सहकारी सोसायटी च्या सभासदांनी आपल्या गरजा अथवा अडचणी सरकार पुढे मांडल्याच पाहिजेत व अशा वेळी राजकीय तटस्था बाजूला ठेवली नाही,तर सर्वच सहकारी चळवळ दुर्बल होऊन ती एकाकी पडेल.
आपला श्रीराम सहकारी साखर कारखाना सभासदांच्या आर्थिक विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे, राजकीय व धार्मिक उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन नाही. म्हणून सहकारी उद्योगांनी राजकीय व धार्मिक बाबतीत अलिप्त असले पाहिजे, सहकारात राजकारण अथवा गटबाजीचे राजकारण आणू अथवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जावू नये, कारण अंतर्गत राजकारणासाठी सहकाराचे बळी पडू नये किंवा दिला जावू नये यांचीच खबरदारी व दक्षता घेतली असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत आहे, हीफलटण तालुक्याच्या दृष्टीने खूप भूषणावह घटना आहे, खरोखरच सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली पाहिजे.
राजकारण निवडणूकी पुरतं,पण विकास आणि सहकार कायमच अग्रेसर असला पाहिजे.
कट्टर राजकीय विरोध बाजूला सारून, सहकार चळवळ टिकली पाहिजे आणि शेतकरी, कामगार वर्ग व सामान्य जनतेचे हित जोपासले पाहिजे , यासाठी अत्यंत सामंजस्याने माघार घेत सहकार्याची भूमिका साकारली आहे.राजकारणा पेक्षा समाजकारण आणि सहकार क्षेत्राला मोठे मानण्याची संबंधित नेत्यांची हि परिपक्वता फलटण तालुक्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाणारी आहे.
पक्ष भेद विसरून तालुक्यातील सहकाराचे मोठे मंदिरांचे उज्ज्वल भविष्य आणि सहकार चळवळ बळकट करण्यासाठी व तालुक्यातील ज्येष्ठ सन्माननीय नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब यांच्या सूचनेला यथोचित सन्मान देऊन सन्माननीय माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णयाबद्दल फलटण तालुक्यातील जनतेच्या वतीने मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन....!!
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात शेअर्स संदर्भातील मांडलेली भूमिकेला सुध्दा समर्पक असे समर्थन देवून दादांनी आपल्या वैभवशाली अभ्यासाचे सहकारातील परिपक्वतेचे दर्शन घडविले..ही सुंदर सुरुवात उद्याचे भविष्य उज्ज्वल ठरो व तालुक्यातील जनतेचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी व उंचावण्यासाठी यशस्वी पताका सदैव फडकवत राहो ...!!!
सहकारात सभासद हा मालक असतो परंतु तो फक्त कागदावरच या सभासदांचे अज्ञान ही त्या संस्थेच्या ताळेबंदातील सर्वात मोठी मालमत्ता असते,या सभासदाला विचारी बनवणे, त्याला प्रशिक्षित करणे, नेतृत्वाचा प्रत्येक निर्णय बौद्धिक कसोटीवर पारखून घेण्याची सवय लावणे हे काम आत्ता सहकार संस्कृती मधून संचालक मंडळ व नेतृत्वाला करावे लागणार आहे.
श्री. नंदकुमार मोरे... फलटण, सामाजिक कार्यकर्ता..
वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरे.... हरित फलटण...मी फलटण कर

No comments