संत शिरोमणी नरहरी महाराज सर्व शाखीय हिंदू सुवर्णकार समाज संस्थेच्या वतीने वारकऱ्यांना बिस्कीट वाटप
फलटण ( गंधवार्ता वृतसेवा ) दि.१८ - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी संत शिरोमणी नरहरी महाराज सर्व शाखीय हिंदू सुवर्णकार समाज संस्था, श्री क्षेत्र फलटण यांच्या वतीने बिस्कीट वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी वाचनालयासमोर झालेल्या या कार्यक्रमात पायी वारी करणाऱ्या असंख्य वारकऱ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले. वारीच्या वाटेवर वारकऱ्यांना क्षणभर विश्रांतीसोबत अल्पोपहार मिळावा या उद्देशाने संस्थेने ही सेवा उपक्रम राबवला.
संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच वाटपाची जबाबदारी सांभाळली. वारकऱ्यांनी देखील संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. "वारी ही फक्त पायी चालणे नसून सेवा करणे हेच खरे वारकरीपण आहे" अशा भावनेतून हा उपक्रम दरवर्षी राबवला जाईल.

No comments