संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे फलटणमध्ये भक्तिमय वातावरणात स्वागत
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ जुलै २०२६ -
टाळ, मृदंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत सोहळा ऐतिहासिक अशा फलटणमध्ये आला. लाखो वारकऱ्यांच्या मुखातून ज्ञानोबा - तुकाराम, माऊली..... माऊली.... नामाचा अखंड जागर सुरू होता. पालखी सोहळा शहराच्या वेशीवर पोहोचला. तेथे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष सौ प्रियदर्शनी भोसले,फलटण प्रांताधिकारी प्रियांका अंबेकर, तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव, फलटण नगर परिषदेत मुख्याधिकारी निखिल जाधव, नगरसेवक व शहरवासियांनी माऊलींसह वैष्णवांचे स्वागत केले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे फलटण शहरात ५.०० वाजता आगमन झाले. पालखी सोहळा मलठण, सद्गुरु हरिबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक मार्गे सायंकाळी ६ वाजता श्रीराम मंदिराजवळ पोहोचला. अश्वांचे व माऊलींसह वैष्णवांचे इथे नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत व दर्शन घेतले. याप्रसंगी पृथ्वीराज राजेमाने, डॉ.पार्श्वनाथ गुंगा, ॲड महेंद्र नलवडे, ॲड अभिजित मोहिते,महादेवराव माने, अमोल सस्ते उपसभापती पप्पू भाई शेख (नगरसेवक) किशोरसिंह नाईक निंबाळकर (माजी नगरसेवक) अनंत भैय्या भोसले, तेजसिंह इंगळे, तुषार नाईक निंबाळकर, दशरथ यादव ,अजित पेटकर पुजारी, अभिजीत निंबाळकर, सुनील जंगम, गोरख पवार, संजय रुपनवर उपस्थित होते.
दरम्यान फलटण शहरवासीयांनी ठिकठिकाणी माऊलींचे स्वागत केले व दर्शन घेतले. त्यानंतर सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, सफाई कामगार कॉलनी या मार्गाने विमानतळावरील प्रशस्त पालखी तळावर विसावला.

No comments