Breaking News

गणेशोत्सवात ‘संडे SHGs मार्ट’ची पर्वणी! नगरपरिषद प्रांगणात महिला बचत गटांच्या दर्जेदार उत्पादनांचा बाजार

‘Sunday SHGs Mart’ celebrated during Ganeshotsav! Market of quality products of women’s self-help groups in the Municipal Council premises

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१३ : गणेशोत्सवानिमित्त फलटण नगरपरिषद अंतर्गत दीनदयाळ जनआजीविका योजना व आत्मनिर्भर शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संडे SHGs मार्ट’ या विशेष आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. दि.  १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत फलटण नगरपरिषद प्रांगणात हा बाजार भरविण्यात येणार आहे.

    या संडे SHGs मार्टमध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले सेंद्रिय, स्वच्छ, हायजिनिक व घरगुती चवीचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ तसेच विविध दर्जेदार घरगुती उत्पादने एकाच ठिकाणी होलसेल दरात उपलब्ध होणार आहेत. या उपक्रमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासोबतच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे.

    गणेशोत्सवानिमित्त आयोजित या विशेष बाजारानंतर ‘संडे SHGs मार्ट’ दर रविवारी फलटण नगरपरिषद प्रांगणात नियमितपणे भरविण्यात येणार आहे.

    फलटणकरांनी कुटुंबासह या बाजाराला आवर्जून भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांची खरेदी करावी व त्यांच्या उद्योगशीलतेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्री. निखिल जाधव, मुख्याधिकारी तसेच श्री. समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष, फलटण नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments