Breaking News

गणेशोत्सवाची लगबग! फलटणच्या माळजाई परिसरात गणेशमूर्तींची दुकाने सजली

Ganesh Chaturthi is almost here! Ganesh idol shops are decorated in Maljai area of ​​Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१३ : लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस शिल्लक राहिल्याने फलटण शहरात गणेशोत्सवाची लगबग वाढली आहे. शहरातील माळजाई परिसरात विविध आकर्षक गणेशमूर्तींची दुकाने सजली असून, गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

    विविध आकार, रूप आणि आकर्षक सजावटीतील गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, आपल्या पसंतीच्या मूर्तीची निवड करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू आहे. त्यामुळे माळजाई परिसरात गणेशोत्सवाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    गणेशमूर्तींसोबतच गणेश मंडपाची सजावट, आरास तसेच पूजेसाठी आवश्यक साहित्याची दुकानेही ठिकठिकाणी थाटण्यात आली आहेत. विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली असून, गणेश मंडळे व घरगुती गणपतीच्या तयारीला वेग आला आहे.

    लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी शहर सज्ज होत असताना माळजाई परिसरातील गणेशमूर्तींच्या दुकानांमुळे गणेशोत्सवाचा उत्साह अधिकच वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

No comments