Breaking News

बु.सहदेव (डिगू) काकडे यांच्या स्मरणार्थ वारकऱ्यांना खाद्यपदार्थ व पाणी वाटप

Distribution of food and water to Warkaris in memory of Bu. Sahadev (Digu) Kakade

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त स्वर्गीय सहदेव सुभाष काकडे (डिगू) यांच्या स्मरणार्थ भीमनगर मित्र परिवाराच्या वतीने वारकरी भाविकांसाठी खाद्यपदार्थ व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.

    पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांना लाडू, चिवडा आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटून सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. वारकरी सेवेला सर्वोच्च मान देत भीमनगर मित्र परिवाराच्या सदस्यांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.

    यावेळी वारकरी भाविकांनी आयोजकांचे आभार मानत या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. स्व. सहदेव (डिगू) काकडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून समाजसेवा, वारकरी सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

No comments