Breaking News

फलटणमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; वारकऱ्यांना अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याचे वाटप

A glimpse of Hindu-Muslim unity in Phaltan; Snacks and drinking water distributed to Warkars

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : आषाढी वारीनिमित्त फलटण शहरात आगमन झालेल्या वारकरी भक्तांच्या सेवेसाठी नवदीप गणेशोत्सव मंडळ आणि व्यापारी मित्र परिवार यांच्या वतीने अल्पोपहार व बिसलेरी पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून फलटणमध्ये पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन घडले.

    पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांना पहाटेच्या वेळी अल्पोपहार व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत सेवा कार्य राबविण्यात आले. या उपक्रमाला वारकरी भक्तांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आयोजकांचे आभार मानले.

    यावेळी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मेहबूबभाई मेटकरी, माजी नगरसेवक आसिफ उर्फ बाळासाहेब मेटकरी, विशालभाऊ, श्री माऊलीबाबा मेटकरी, हैदरभाई मेटकरी, रिजवान उर्फ मॉन्टी मेटकरी, तौसीफ मेटकरी यांच्यासह हिंदू-मुस्लिम बांधव आणि व्यापारी मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    वारकरी सेवेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि धार्मिक ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम फलटणकरांसाठी प्रेरणादायी ठरला.

No comments