Breaking News

बारामतीतील कटफळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली सापडून गुणवरे (ता. फलटण) येथील व्यक्तीचा मृत्यू

A person from Gunavare (Phaltan taluka) died after being caught under a train near Katfal railway station in Baramati

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२२ जुलै २०२६ - बारामती एमआयडीसी परिसरातील कटफळ रेल्वे स्थानकाजवळ आज एक धक्कादायक घटना घडली. धावत्या रेल्वेखाली सापडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार आत्महत्येचा असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

    मृत व्यक्तीची ओळख दादासाहेब पांडुरंग गावडे (रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा) अशी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने आपल्या पायावर गावाचे नाव 'गुणवरे' तसेच मोबाईल क्रमांक लिहून ठेवला होता.

    घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नेमके कारण आणि घटनेची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

No comments