स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 'राज इन्फ्रास्ट्रक्चर'कडून भावपूर्ण अभिवादन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर 'राज इन्फ्रास्ट्रक्चर'च्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी कंपनीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात, "तुम्ही आमच्यासोबत होता, आजही आहात, अशीच भावना आहे. तुमचा प्रत्यक्ष सहवास आज नसला तरी तुमचे विचार, कार्यशैली आणि नेतृत्वाचा वारसा आम्हाला कायम प्रेरणा देत राहील," अशा शब्दांत स्व. अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यात आली.
स्व. अजितदादा पवार यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान, त्यांची कार्यतत्परता आणि जनसामान्यांशी असलेले नाते कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम, श्रद्धांजली सभा आणि विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

No comments