Breaking News

रामराजेंकडून क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुलेंना अभिवादन; समाजाला दिला समतेचा मंत्र

Ramraje pays tribute to Mahatma Jyotirao Phule, the Sun of Revolution; Gives the mantra of equality to the society

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ एप्रिल २०२६ - महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त केली तसेच समाजाला समतेचा आणि शिक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.

    रामराजे साहेबांनी जयंती निमित्त दिलेल्या संदेशात, फुले यांच्या विचारांप्रमाणे समाजात शिक्षण, समानता आणि बंधुता वाढवण्याची गरज अधोरेखित केली. त्यांच्या या संदेशामुळे कार्यक्रमाला एक विचारप्रधान दिशा मिळाली.

    यावेळी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. साधेपणाने आणि आदरपूर्वक फुले यांना अभिवादन करण्यात आले.

    प्रमुख आकर्षण — 3D सेल्फी पॉईंट

    कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या 3D सेल्फी पॉईंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत फुले यांच्या प्रतिमेसोबत सेल्फी काढत हा क्षण संस्मरणीय केला.

No comments