Breaking News

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून फलटण येथे महात्मा फुले यांना अभिवादन

Rural Development Minister Jayakumar Gore pays tribute to Mahatma Phule in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ एप्रिल २०२६ - क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज फलटण येथील महात्मा फुले चौकात भेट दिली. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान सामाजिक कार्याचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण व विनम्र अभिवादन केले.

    अभिवादनप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक नगरसेवक, नगरसेविका आणि फलटण शहरासह तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments