Breaking News

आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह यांच्याकडून महात्मा फुले यांना अभिवादन

MLA Sachin Patil and Mayor Shamsher Singh pay tribute to Mahatma Phule

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ एप्रिल २०२६ - महत्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    यावेळी युवा नेते अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, नगरसेवक संदीप चोरमले, सचिन अहिवळे, राहुल निंबाळकर, किरण राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

    या कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या कार्याचा व समाजसुधारणेतील योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

No comments