Breaking News

श्रीमंत संजीवराजे यांच्याकडून महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन

Greetings to Mahatma Jyotirao Phule from Shrimant Sanjeevraje

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ एप्रिल २०२६ - सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत सामाजिक कार्याला उजाळा दिला.

    महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. 3D सेल्फी पॉईंटमध्ये महात्मा फुले यांच्या जीवनातील प्रसंगाचे वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या उत्साहात येथे फोटो काढत सहभाग नोंदवला.

    कार्यक्रमाच्या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

    या उपक्रमामुळे तरुणांमध्ये इतिहास आणि समाजसुधारकांविषयी जागरूकता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

No comments