Breaking News

फलटणमध्ये शिवजयंतीनिमित्त मिरवणूक ; आठवडी बाजाराची जागा बदलली

Procession in Phaltan on the Occasion of Shivjayanti; Weekly Market Relocated

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि १७ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रविवार दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी फलटण शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने,आठवडी बाजार नेहमीच्या ठिकाणी न भरता पर्यायी ठिकाणी हलविण्यात आला  असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी कळवले आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुढे महात्मा फुले चौक ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा या मार्गावर मिरवणूक काढण्यात येणार असल्यामुळे वाहतूक व गर्दीचे नियोजन करण्यात येत आहे.  याच दिवशी होणारा आठवडी बाजार नेहमीच्या ठिकाणी न भरता पर्यायी ठिकाणी हलविण्यात आला आहे. गिरवी नाका ते शासकीय विश्रामगृह, तसेच बीएसएनएल ऑफिस रोड ते कामगार वसाहत या परिसरात बाजार भरविण्यात येणार असल्याची माहिती फलटण नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखील जाधव यांनी केले आहे.

No comments