Breaking News

हॉटेल्सवर रेड ; 13 घरगुती वापराचे गॅस सिलेंडर जप्त

Raid on hotels; 13 domestic gas cylinders seized

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ मार्च २०२६ -  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील पत्र क्र.संकीर्ण-2026/प्र.क्र.35/ नापु-27 08 मार्च 2026 अन्वये सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील इंधन पुरवठा साखळीवर अनावश्यक ताण येऊ नये यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय, सातारा यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार फलटण तहसील व पुरवठा विभागातर्फे फलटण तालुक्यात भरारी तपासणी पथक स्थापन करणेत आलेले आहे. सदर पथकाद्वारे हॉटेल आस्थापन चहाचे स्टॉल, यांची पथकाव्दारे अचानक तपासणी करणेत येत आहे. त्यामुळे जे हॉटेल व्यावसायिक आपल्या व्यवसायासाठी घरगुती गॅसचा वापर करत असतील त्यांच्या विरुध्द जीवनावश्यक कायदा 1955 अन्वये कलम 3 व 7 नुसार कार्यवाही करणेत येईल, याबाबत सुचना देण्यात आलेली होती. त्याअनुषंगाने आज दि. 16/03/2026 रोजी कोळकी व फलटण शहरात अचानक धाडी टाकून 13 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करणेत आले. सदरची अचानक धाड ही डॉ. अभिजीत जाधव तहसिलदार फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. नितीन कांबळे पुरवठा निरिक्षण अधिकारी फलटण नेतृत्वाखाली श्रीमती अश्विनी पोहरे पुरवठा निरिक्षक फलटण, अनिकेत केकाण पुरवठा लिपीक, किरण चवरे पुरवठा लिपीक, ओंकार गवारी शिपाई, यांचे सहकार्य लाभाले.

No comments