अजितदादांच्या निधनामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१८ - महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यंदाचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे माहिती देत सर्व कार्यकर्ते व हितचिंतकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारचे वाढदिवसाचे कार्यक्रम, शुभेच्छा फलक किंवा सत्काराचे आयोजन करू नये.
दिवंगत नेत्याच्या स्मृतीप्रित्यर्थ शांतता व साधेपणा राखत वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

No comments