Breaking News

वडजल येथील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश ; विष्णुपंत लोखंडे व धनंजय साळुंखे पाटील यांना एकमुखी पाठिंबा

People from Vadjal join BJP; extending support to Vishnupant Lokhande and Dhananjay Salunkhe Patil.

फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ जानेवारी २०२६ - माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील (तात्या) तसेच अमरसिंह उर्फ अभिजीत (भैया) नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद वाठार- निंबाळकर गटाचे उमेदवार विष्णुपंत (आण्णा) लोखंडे व पंचायत समिती सुरवडी गणाचे उमेदवार धनंजय (दादा) साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडजल येथील अनेक मान्यवर व युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

     यामध्ये योगेश ढेंबरे (मा.उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य),गायत्री पिसाळ (विद्यमान ग्रामपंचायत सदस्य), सचिन पिसाळ (मा. उपसरपंच), महादेव ढेंबरे (मा. उपसरपंच), मल्हारी ढेंबरे, किरण बाळासाहेब ढेंबरे, माणिक ढेंबरे (नाना), विशाल ढेंबरे, राजू ढेंबरे, अजय ढेंबरे, गणेश ढेंबरे, प्रसाद ढेंबरे, ओंकार ढेंबरे, सुभाष ढेंबरे, श्रावण ढेंबरे, सागर ढेंबरे, तुषार ढेंबरे, संदीप भगवान ढेंबरे, पंकज ढेंबरे, संग्राम ढेंबरे, सचिन शरद ढेंबरे, संदीप ढेंबरे, अशोक मगर, विष्णू जाधव, सागर पिसाळ, दिनेश पिसाळ, तसेच उजवीकडील यादीतील शेखर पिसाळ, प्रशांत पिसाळ, सुनील पिसाळ, नाना रिटे, आप्पा साहेबराव पिसाळ, सचिन मांढरे व स्वप्निल पवार यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

     या प्रसंगी वडजल येथील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांना सोबत घेऊन, संघटितपणे पक्षवाढीसाठी काम करण्याचे आश्वासन दिले. युवा व अनुभवी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हा भाजप पक्षासाठी बळकटी देणारा ठरणार असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारांचे हात अधिक मजबूत होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

    दरम्यान आज सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय हा भाजप पक्षाच्या वाढीसाठी व अधिकृत उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे. यापुढेही सर्व कार्यकर्ते एकमताने, एकविचाराने व नव्या उमेदीने पक्षासाठी कार्यरत राहतील, असे यावेळी ठामपणे यावेळी वडजल येथील ग्रामस्थांनी सांगितले दरम्यान यामुळे वाठार निंबाळकर गटाचे उमेदवार विष्णुपंत लोखंडे तसेच सुरवडी पंचायत समितीचे उमेदवार धनंजय साळुंखे पाटील यांचा विजय सोपा झाला आहे.


No comments