Breaking News

हाकेच्या अंतरावर एमआयडीसी ; रोजगार व पाण्याचा प्रश्न मा.खा.रणजितसिंह यांच्या माध्यमातून सुटला – आ. सचिन पाटील

    The issues of employment and water were resolved through Ranjitsinh – MLA Sachin Patil

 फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२६ - दुधेबावी गावाच्या शेजारी अगदीच हाकेच्या अंतरावर एमआयडिसी सुरु होतेय तसेच वर्षभरात पाणी आंदरूड पर्यंत येणार असून, त्या एमआयडिसी मध्ये पंधरा ते वीस हजार नोकऱ्या मिळणार आहेत, त्या ठिकाणी स्थनिकांना जास्तीत जास्त नोकऱ्या मिळणार असून त्यासाठी भाजपच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उभे असलेले भाऊसाहेब मोरे व मनीषाताई सोनवलकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन आ. सचिन पाटील यांनी केले.

   दुधेबावी येथे बरड गटाचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे,तसेच दुधेबावी पंचायत समितीचे उमेदवार सौ. मनीषाताई सोनवलकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत आमदार सचिन पाटील बोलत होते यावेळी  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा सरपंच सौ.भावनाताई सोनवलकर, जिल्हा परिषदेचे उमेदवार भाऊसाहेब मोरे,पंचायत समितीच्या उमेदवार सौ.मनीषाताई सोनवलकर,युवानेते मुनीश जाधव, लक्ष्मण सोनवलकर,नानासाहेब आडके, सचिनशेठ चांगण, संतोष सोनवलकर, भाऊसाहेब सोनवलकर, त्रिंबक सोनवलकर, हणमंत चांगण हे उपस्थित होते.

    यावेळी बोलताना आ. सचिन पाटील म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मिटणार आहे,तसेच रस्ते रेल्वे यामुळे दळणवळण सोपे होणार असून शेतकऱ्यांना शेती उत्पादनातून आर्थिक स्थर्य प्राप्त होणार असून आता आपल्याला जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये आपले उमेदवार निवडून आणून ग्रामीण भागातील गतिमान विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी बरड गटाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे तसेच दुधेबावी गणाच्या  मनीषाताई सोनवलकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले.

 यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी प्रस्ताविक केले तर आभार नानासाहेब आडके यांनी मानले. 

No comments