जयकुमार शिंदे व युवराज सस्ते (चेअरमन) यांची प्रचारात आघाडी ; गावागावात होत आहे मोठ्या जल्लोषात स्वागत
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ - कोळकी जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ) गणाचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या गाव भेटीला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रत्येक गावातून तरुणांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आम्ही सर्वजन विकासा बरोबर आहोत असा शब्द मतदार देत असून, माढा लोकसभा मतदार संघांचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच आमदार सचिनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली, काम करत असणाऱ्या जयकुमार शिंदे व युवराज सस्ते यांना मतदारांकडून विजयाचा आशीर्वाद मिळत आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यात विकासाचा डोंगर उभा करीत, आता आपल्याला राजकारणात कोणाचाही बदला घ्यायचा नाहीतर, बदल घडवायचा असून, तो बदलाव विकासाच्या दृष्टीकोन ठेऊन, नीरा देवघर,धोम बलकवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधावर पाणी पोहोचून शेती उत्पन्न वाढून आर्थिक क्रांती घडविण्यासाठी कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ) गणाचे उमेदवार युवराज सस्ते यांना प्रचंड मतांनी निवडून देऊ असा विश्वास सासकल,निरगुडी गावातून व्यक्त केला आहे.


No comments