कोळकी येथे शिवसेनेचे सह्याद्री कदम व अशोक नाळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोळकी जिल्हा परिषद गटातून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे अधिकृत उमेदवार सह्याद्री कदम तसेच पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवार अशोक नाळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज कोळकी (ता. फलटण) येथे उत्साहात पार पडला. या प्रचाराचा शुभारंभ श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी कोळकी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्तूपंत शिंदे, पत्रकार बापूराव जगताप, नरसोबा पतसंस्थेचे व्यवस्थापक रवींद्र नाळे, माजी सरपंच कुंडलिक नाळे, सरपंच पखाले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने श्री गणेश मंदिर व हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढवून विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. सह्याद्रीभैय्या कदम व अशोक नाळे हे लोकहितासाठी काम करणारे उमेदवार असून त्यांना मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
या प्रचार शुभारंभामुळे कोळकी परिसरात निवडणूक वातावरण तापले असून शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments