कोळकी ग्रामपंचायत सदस्य व बाजार समिती संचालक अक्षय गायकवाड यांचे बंधू अनुप गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ - कोळकी ग्रामपंचायत सदस्य व बाजार समिती संचालक अक्षय गायकवाड यांचे बंधू तथा कोळकी गावचे युवा नेते अनुप शामराव गायकवाड यांचा आज आमदार सचिन पाटील व शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गटाला राम राम करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला. यावेळी अनुप गायकवाड यांनी राजे गटात कोणतेही काम होत नसल्याने बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांची वारंवार कुचंबणा केली जात असल्याचे मत व्यक्त केले व यापुढे महायुतीचे प्रमुख माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील तसेच शिवरूपराजे खर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार सचिन पाटील यांनी अनुप गायकवाड यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले व यापुढे अनुप गायकवाड याना पक्षात सन्मानजनक स्थान देण्यात येईल असे मत व्यक्त केले.

No comments