कोळकीचे माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश काशिद यांचा भाजपमध्ये प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२६ - कोळकी गावचे उद्योजक तथा माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश काशिद यांनी राजेगटाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला, यामुळे राजेगटाला धक्का बसला असून, उमेश काशिद हे राजेगटाचे युवा नेतृत्व असून आपल्या स्वादिष्ट व कुरकुरीत अशा "समोसा"ने उमेश काशिद हे प्रचंड प्रसिद्ध आहेत.
दरम्यान युवा उद्योजक तसेच युवकांची मोठी फळी असलेल्या उमेश काशिद यांनी राजेगटाला रामराम केला असून, यापुढे विकासा बरोबर राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यांचे भाजपा मध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वागत केले आहे.यामुळे जिल्हा परिषदेचे उमेदवार जयकुमार शिंदे अन् कोळकी पंचायत समितीचे उमेदवार विकास नाळे यांच्यामागे मोठी ताकद निर्माण झाली आहे.
उमेश काशिद हे अतिशय चांगले युवा कार्यकर्ते आहेत, त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्याचा फायदा कोळकी व गटात जयकुमार शिंदे व विकास नाळे यांना निवडून येण्यास बळ मिळणार आहे. हा प्रवेश यशस्वी करण्यासाठी स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष पै. स्वागतशेठ काशिद यांचे मोठे योगदान आहे. या प्रवेशाप्रसंगी सतिश शेडगे,किरण जाधव,बाळासाहेब रिटे, अभिजत शिंदे ,वैभव गंगतिरे उपस्थित होते.

No comments