Breaking News

राजे गटाला धक्का ; दडसवस्ती कुरवली येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Hundreds of citizens from Dadswasti Kuravali join the BJP.

फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२६ - कोळकी गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार जयकुमार शिंदे तसेच जाधववाडी (फ.) पंचायत समिती गणाचे उमेदवार युवराज सस्ते (चेअरमन) यांनी प्रचारात ठोस आघाडी घेतली असून, त्यांना मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आज राजे गटाला धक्का बसला असून दडसवस्ती, कुरवली परिसरातील शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले जयकुमार शिंदे व युवराज सस्ते हे नेहमीच सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या या जनसंपर्काचा प्रभाव आजच्या प्रवेशातून स्पष्टपणे दिसून आला.

मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद उमेदवार जयकुमार शिंदे व पंचायत समिती उमेदवार युवराज सस्ते यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला. “मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून आम्ही भाजपात प्रवेश करत आहोत,” अशी भावना युवा कार्यकर्ता ज्ञानेश्वर (माऊली) पिसाळ यांनी व्यक्त केली.

यावेळी कुमार दडस, ज्ञानेश्वर पिसाळ, निलेश सूळ, हेमंत निंबाळकर, अजित ठोंबरे, वैभव दडस, राजू नाळे, ब्रहदेव पिसाळ, शंकर दडस, अजित गोळे, आकाश आगवणे आदी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रवेशामुळे कोळकी गट व जाधववाडी (फ.) गणात भाजपाची ताकद वाढली असून निवडणूक लढतीत जयकुमार शिंदे व युवराज सस्ते यांची आघाडी अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसत आहे.

No comments