पंचायत समिती विडणी गणातील भाजपाचे उमेदवार सचिन गजानन अभंग यांचा प्रचार शुभारंभ
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२२ - विडणी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ, दि.२३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते उत्तरेश्वर मंदिर विडणी येथे होणार असल्याची माहिती विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी दिली.
विडणी गणातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री. सचिन गजानन अभंग निवडणूक रिंगणात असून, त्यांच्या उमेदवारीचे विडणी गणातुन स्वागत होत आहे.
प्रचार शुभारंभ कार्यक्रमक्रमास जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणतील भाजपा - राष्ट्रवादीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

No comments