मुधोजी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ; अर्जुन पुरस्कार प्राप्त स्वप्निल संजय पाटील यांची उपस्थिती
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण व बक्षीस समारंभ बुधवार दिनांक ११ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार प्राप्त आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी स्वप्निल संजय पाटील उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे राहणार आहेत.
या समारंभात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विविध स्पर्धांमध्ये मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी. एच. कदम, उपप्राचार्य, समन्वयक तसेच महाविद्यालय विकास समिती, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments