Breaking News

महिलांच्या लैंगिक छळापासुन संरक्षणासाठी कार्यालयात तक्रार निवारण समिती आवश्यक

Grievance redressal committee required in office to protect women from sexual harassment

     सातारा दि. १५ -  महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी ज्या आस्थापनामध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी आहेत अशा कार्यालयांमध्ये अधिनियम 2013 मधील कलम 4 नुसार अंर्तगत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. जिल्हयात कार्यरत सर्व आस्थापनांनी शासनाच्या SHE BOX PORTAL वरती नोंदणी करणेबाबत आदेशित केलेले आहे आणि आपले कार्यालयाचे नोंदणी झाल्यानंतर आस्थापनेच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीची संपूर्ण माहिती सदर पोर्टलवरती अदयावत करावयाची आहे.

    कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून (संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील कलम 19 अन्वये आपण आपले कार्यालयात कामकाज करणा-या महिलांना सुरक्षित व अनुकूल वातावरण पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी कार्यालय प्रमुखाची आहे. याअनुषंगाने कार्यालयाची नोंदणी व अंतर्गत तक्रार निवारण समितीची माहिती SHE BOX PORTAL वर अदयावत करणे अधिनियमांतर्गत बंधनकारक आहे. ज्या आस्थापना अंतर्गत तक्रार समित्या स्थापन करणार नाहीत अशा शासकिय व खाजगी आस्थापनांना सदर अधिनियमात अतंर्भुत असलेल्या कलम २६ (१) प्रमाणे कार्यालय प्रमुखास व खाजगी आस्थापनांच्या प्रमुखास (मालकास) रक्कम रु. ५०,०००/- रूपयापर्यंत  दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.

    सूचना देऊन ही अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन केली नसल्यास खाजगी आस्थापनाच्या प्रमुखांना (मालकांना) या कायदयातील कलम २६ (२) नुसार परवाना  रदद करुन दुप्पट दंडाची तरतुद करणेत आलेली आहे. तरी पुढील कार्यवाही टाळण्याकरीता, आपण तात्काळ SHE BOX PORTAL अदयावत करावे. अधिक माहिती करीता पुढिल कार्यालय संपर्क साधावा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस.टी .स्टॅण्डजवळ, सातारा संपर्क क्रमांक – ९८५०३५४३९२ व ९८५०१८७१२२  या क्रंमाकावर संपर्क साधावा.

No comments