फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनोळखी तरुणाचा गळफास घेऊन मृत्यू
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.७ : फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार पेठ येथील स्मशानभूमी परिसरात एका अनोळखी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे फलटण हद्दीत मंगळवार पेठ येथील स्मशानभूमीजवळ आठमोरी कॅनॉल परिसरातील बाभळीच्या झाडाला सुमारे ३५ वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाने गळफास घेतल्याचे आढळून आले. ही घटना सकाळी ७.४० वाजण्यापूर्वी घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार आतीश हनुमंत चांदगुडे यांनी दिलेल्या खबरवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (मयत रजिस्टर नं.१४/२०२६) भा.न्या.सं. कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याबाबत पोलीसांकडून तपास सुरू आहे. या घटनेचा पुढील प्राथमिक तपास सहाय्यक फौजदार बारेला हे करीत आहेत.

No comments