Breaking News

दुग्ध व्यवसायातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी गोविंद फाउंडेशनला नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५

Govind Foundation wins Netherlands International Impact Award 2025 for empowering women in dairy farming

 फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ जून २०२६ : दुग्ध व्यवसायातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, गोविंद फाउंडेशनला नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचा आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविलेल्या उपक्रमांचा गौरव मानला जात आहे.

    भारतातील नेदरलँड्सच्या राजदूत मा. एच. ई. मारिसा जेरार्ड्स यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या संचालिका श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अजयसिंहराजे नाईक निंबाळकर, श्री. धर्मेंद्र भल्ला तसेच डॉ. शांताराम गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी गोविंद फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, हा पुरस्कार केवळ संस्थेचा नसून सर्व सहकारी, कार्यकर्ते, लाभार्थी महिला आणि हितचिंतकांच्या एकत्रित प्रयत्नांचा सन्मान आहे. या गौरवामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने, समर्पणाने आणि व्यापक स्तरावर कार्य करण्याची नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

    संस्थेने या यशासाठी सर्वांचे प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच हा सन्मान ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ देणारा ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

No comments