प्रेम त्रिकोणातून झालेल्या खून प्रकरणात 'पती, पत्नी और वो' जेरबंद
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२३ - महिलेच्या पहिल्या प्रियकराने तिच्या नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला जीवे मारून लाकडे कापण्याच्या मशीनने शरीराचे तुकडे करून काही अवयव नदीत फेकल्याची घटना घडल्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत, अनैतिक संबंधातून तिघांनी मिळून सतीश दडस याचा खून केल्याचे उघडकीस आणून, या प्रकरणात 'पती, पत्नी और वो' यांना अवघ्या ०४ तासामध्ये जेरबंद केले आहे.
मौजे सोमंथळी ता. फलटण गावचे हद्दीतील सतीश उर्फ आप्पा दादासो दडस यय २७ वर्ष हा युवक मिसिंग झाल्याबाबत दिनांक २१/०१/२०२६ रोजी त्यांचा भाऊ सागर दडस यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मिसिंग नंबर ११/२०२६ प्रमाणे तक्रार दिली होती
प्रस्तुत मिसिंगमध्ये मिसिंगचा घातपात झाल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर फलटण ग्रामीण पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून मौजे विडणी गावातील रेखा लक्ष्मण बुधावले हिचे सतिश तुकाराम माने या इसमाबरोबर सुरुवातीला प्रेमसंबंध होते. नंतर तिचे मयत सतिश दंडस याचे बरोवर प्रेमसंबंध निर्माण झाल्याने त्या गोष्टीचा राग मनात धरुन मिसिंग व्यक्तीचा घातपात झाल्याची माहिती प्राप्त झाली.
तपासामध्ये गोपनीय व तांत्रिक माहिती प्राप्त करुन इसम नामे लखन बंडू बुधावले, सतिश तुकाराम माने याला शिताफीने ताब्यात घेतल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तर देवून काही एक माहिती सांगितली नाही, आंम्ही गुन्हाच केला नाही असे सांगितले. परंतू पोलीसांनी कौशल्यपुर्व तपास करुन महिला नाम रेश्मा लखन बुधावले हिला ताब्यात घेतल्यावर पोलीसी खाक्या दाखवताच तिने माझे व सतिश दडस याचे प्रेमसंबंधाचे कारणावरुन दिनांक-१४/०१/२०२६ रोजी सतिश उर्फ आप्पा दडस यांचेशी सतीश माने, लखन बुधावले यांचा वाद झाला होता. त्यावेळेस लोखंडी रोडने मारहाण करुन गंभीर जखमी केले होते. नंतर तेथून त्यास दवाखाण्यात घेवून जात असल्याचा बनाव करुन विडणी येथील मांगोबामाळ परिसरात नेहून त्यांचे डोक्यात दगड घालून त्याचा खून केला व रात्र झाल्यानंतर तिघांनी मिळून बॉडी लाकूड कापण्याच्या मशीने तुकडे करुन दोन पोत्यामध्ये भरुन साठेगावचे हद्दीत शेततळे व निरा नदीच्या पत्रामध्ये बॉडीचे पोते वेगवेगळ्या ठिकाणी टाकून पुरावा नष्ट केला होता. काल रोजी दाखल झालेल्या मिसिंगच्या तपासावरुन पोलीसांनी अतिशय क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणून ०३ आरोपींना अवघ्या ०४ तासामध्ये अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. तुषार दोशी सोो, पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर सोो, अपर पोलीस अधीक्षक, मा.विशाल खांचे सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनांनुसार संदीप जगताप, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत सुबनावळ, सहा. पोलीस निरीक्षक, डी. बी. पथकाचे दिपक पवार. पोलीस उपनिरीक्षक, शिवानी नागवडे, म. पो. उपनिरीक्षक, पो. हवा. प्रदीप खरात, वैभव सुर्यवंशी, नितिन चतुरे. अमोल जगदाळे, विक्रम बनकर, गणेश यादव, संदीप मदने, अमोल चांगण, श्रीनाथ कदम, पो. कॉ. हनुमंत दडस, तुषार नलवडे, गणेश ठोंबरे, शिवराज जाधव, अमोल देशमुख, सुरज काकडे, अविनाश शिंदे, व यु.आर. पैदाम. म. पो. हवालदार, म.पो.कॉ. गौरी सावंत यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.

No comments