Breaking News

मूळ फलटणची असणारी शर्मिष्ठा शिंदे झाली 'मिस लेगसी युनीव्हर्स २०२०'

Sharmishtha Shinde became Miss Legacy Universe 2020

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - शिंदेवाडी ता. फलटण येथील मूळ रहिवासी असणाऱ्या डॉ. शर्मिष्ठा राम शिंदे यांनी, मिस लेगसी युनीव्हर्स २०२०" ही आंतरराष्ट्रीय दर्जाची  सौंदर्य स्पर्धा जिंकून क्वीन चा किताब मिळवला आहे. घाणा देशाच्या वतीने भरवण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेत भारताची सौंदर्यवती शर्मिष्ठा शिंदे यांचा प्रथम क्रमांक  तर फर्स्ट रनरअप घाणा देशाची सौंदर्यवती "त्रिसिया बासोह"  आणि सेकंड रनर अप ठरली इंडोनिशियाची साब्रीना आयुल. 

        मिस लेगसी युनीव्हर्स २०२० या स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल शर्मिष्ठा शिंदे हिचे  सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. याअगोदरही शर्मिष्ठाने हैद्राबाद मध्ये  " कँपस प्रिंसेस फायनलीस्ट २०२०" हि सौंदर्य स्पर्धा जिंकली होती.  फेमिना मिस इंडिया  या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन फेब्रुवारी २०२० मधे केले होते. या स्पर्धेच्या परिक्षक श्रेया राव (मीस इंडीया रनरअप २०१८) होत्या.

        मूळ रहिवासी शिंदेवाडी ता. फलटण येथील असणाऱ्या पण सध्या पुणे येथे  वास्तव्यास असणाऱ्या डॉ. शर्मिष्ठा राम शिंदे या मलठण येथील बापूसाहेब बाळासाहेब शिंदे, यांची नात आहेत. शर्मिष्ठा कथ्थक आणि बेली डान्स मध्ये प्रविण असुन प्रसिद्ध मॉडेल आहे. देश परदेशातील जाहीराती मध्ये ती भाग घेते. शर्मिष्ठाने दंत वैद्याचा कोर्स (BDS) पुर्ण केला असुन सध्या भारती विद्यापीठात प्रशिक्षण घेत आहे. शर्मिष्ठाला या वेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी तिच्या आई वडिलानी प्रोत्साहन दिले आहे. व्यायाम आणि आहाराकडे तिचे विशेष लक्ष आहे. ति जाहिरात व मॉडलिंग क्षेत्रात काम करत राहणार आहे.

No comments