Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-२०१९ करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

Deadline for online application for Babasaheb Ambedkar National Research Scholarship-2019 extended till April 15

        मुंबई - : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-२०१९ साठी १०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे.

        ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि.१५ फेब्रुवारी २०२१ ते दि. १५ मार्च २०२१ पर्यंत देण्यात आलेली होती. आता ही मुदत दि. १५ एप्रिल २०२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

        अधिक माहितीसाठी बार्टी पुणे च्या संकेतस्थळावर https://barti.maharashtra.gov.in >Notice Board ला भेट द्यावी, असे बार्टी, पुणे चे महासंचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments