विडणी गावातील विजवाहिन्या अंडर ग्राउंड, आता यात्रा किंवा उत्सवात जाणार नाही वीज - सरपंच सागर अभंग
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.15 - विडणी गावामध्ये भैरवनाथ यात्रा तसेच लक्ष्मी आईची यात्रेच्या वेळी कावड/ सासन काठ्यांना मिरवणुकीत विजेच्या तारांमुळे अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे ऐन यात्रेच्या दिवशी गावठाणातील वीज पुरवठा बंद ठेवावा लागत होता. संपूर्ण गावठाण अंधारात जायचे त्यामुळे याला कायमचा उपाय म्हणून लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी पाठपुरावा करीत वीज वाहिन्या बंदिस्त करून आपले गाव सुरक्षित केले आहे.
दरम्यान विडणी हे बागायती गाव म्हणून परिचित आहे. यामुळे उसाने भरलेल्या उंच ट्रॉल्यातून होणारी वाहतूक असेल, गणेश विसर्जन व इतर मिरवणूका असतील किंवा शेतमालाची गाड्यामधून होणारी वाहतुकीस धोकादायक झालेल्या विजेच्या तारांपासून नागरिकांची कायम स्वरूपी सुटका होणार आहे.तसेच विडणी गावठाणात नव्याने बांधण्यात येणाऱ्या बंगल्यांच्या गॅलरीच्या किंवा उंच इमारतीना अगदी जवळून जाणाऱ्या या विजेच्या तारा घरातील लहान मुले तसेच नागरिकांसाठी अतिशय धोकादायक झाल्या होत्या. आता तो धोका टळला असून ग्रामस्थांनी या कामामुळे समाधान व्यक्त केले आहे.
विडणी गावच्या गावठाणातील या विजेच्या तारा कायमस्वरूपी इतिहास जमा होतील व यापुढे गावची यात्रा किंवा अन्य सण किंवा उत्सवांच्या वेळी गावातील वीज पुरवठा बंद/खंडित करण्याची वेळ येणार नाही.विडणी गावचा विकास हाच आमचा ध्यास ही संकल्पना सत्यात उतरून लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी आपल्या गावाचा व वाडीवस्तीला मूलभूत सुविधा पुरवीत आदर्श गाव निर्माण केले असून या कामात आता विजेचा कोणताही धोका किंवा अडथळा होणार नसल्याने ग्रामदैवत भैरनाथ यात्रा असेल किंवा गणपती उत्सव असेल किंवा जड वाहतूक असेल याला कोणतीही अडचण भासणार नाही असे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी आवर्जून सांगितले आहे.

No comments