Breaking News

कचराकुंडी मुळे लहान मुलांच्या आरोग्यास धोका ; जि.प. केंद्र शाळा बिजवडी येथील प्रकार

Garbage bins pose a health risk to children; Case at ZP Kendra School, Bijwadi

    बिजवडी (महेंद्र भोसले) दि.१६ -  बिजवडी गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असलेल्या अंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटवरच असलेल्या कचराकुंडीमुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शालेय व्यवस्थापन समितीने वारंवार ग्रामपंचायतला लेखी व तोंडे विनंती अर्ज देऊनही - ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे संबंधित कचराकुंडी हलवली जात नाही.

    कचराकुंडीमध्ये रहिवाशी लोक खरखटे, भाजीचे कांद्याचे टरफले प्लास्टिक पिशव्या, नॅपकिन , फाटलेले कपडे , अशा अनेक आरोग्यास हानिकारक वस्तू त्या कचरा कुंडीत टाकत असल्यामुळे, शाळेच्या आवारात व परिसरात अत्यंत उग्र असा घाणेरडा वास येत असतो, याबाबत ग्रामसेवकला विचारणा केले असता, त्यांच्याकडून उडवा उडवीचे उत्तरे मिळत आहेत . कचराकुंडी दुसरीकडे हलवावी असा शाळेतील शिक्षकांचा , शेजारील ग्रामस्थांचा व मुलांचा आग्रह असूनही ग्रामपंचायत त्याकडे जाणून-बजून दुर्लक्ष करत आहे.

    लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये बांधण्यात आलेली स्वच्छतागृहे सिंटॅक्स च्या मोठमोठ्या टाक्या व भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही पाणी भरण्याअभावी कोरड्या ठणठणीत आहेत. लहान मुलांना शौचास जायला गरज पडली तर टाकीत पाणी नसल्यामुळे ते तिथे जाऊ शकत नाहीत. परिणामी त्यांना शाळा सुटल्यानंतर घरी येऊनच आपले पोट रिकामे करावे लागत असल्यामुळे , भविष्यात त्यांना पोटाच्या हे समस्या जाणवू शकतात. याकडेही ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष देऊन संबंधित कचराकुंडी तिथून त्वरित हलवावी व पाण्याच्या टाक्यांना कनेक्शन जोडून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे. अशी मागणी विद्यार्थ्याकडून , शालेय व्यवस्थापन समितीकडून व पालकाकडून होत  आहे.

No comments