नगराध्यक्ष पदासाठी ३ जणांचे अर्ज तर नगरसेवक पदासाठी २२ नामनिर्देशन दाखल
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - फलटण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. तर नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष अशा दोन प्रकारे तर प्रशांत अहिवळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.
प्रभाग क्रमांक ४ मधून प्रभा हेंद्रे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक ५ मधून अशोक जाधव, प्रतापसिंह नाईक निंबाळकर, श्रद्धा गायकवाड आणि रोहित नागटिळे यांनी उमेदवारी अर्ज भरले. प्रभाग क्रमांक ६ मधून किरण राऊत आणि मंगलादेवी नाईक निंबाळकर यांनी, तर प्रभाग क्रमांक ७ मधून अशोक जाधव, अमोल घाडगे, राजश्री राहिगुडे, पूजा घनवट आणि राजेंद्र निंबाळकर यांनी उमेदवारी दाखल केली.
प्रभाग क्रमांक ८ मधून सिद्धाली अनुप शहा, प्रभाग क्रमांक ९ मध्ये सचिन गानबोटे, अमोल भोईटे आणि रझिया मेटकरी यांनी अर्ज सादर केले. प्रभाग क्रमांक १० मधून अमित भोईटे आणि जयश्री भुजबळ, तर प्रभाग क्रमांक १२ मधून प्रवीण आगवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
प्रभाग क्रमांक १३ मधून सचिन सूर्यवंशी-बेडके, विजया कदम आणि राहुल निंबाळकर यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले.
नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२५ असून, उमेदवारी अर्जाची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
अपिल नसलेल्या नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५ आहे.तर अपिल असलेल्या नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२५ आहे. निवडणूक चिन्ह वाटप तसेच अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

No comments