प्रभाग क्रमांक ९ मधून परविन मेटकरी यांची उमेदवारीची मागणी; बाळासाहेब मेटकरी यांचा जनसंपर्क ठरतोय बळ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ नोव्हेंबर २०२५ - आगामी फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, विविध प्रभागांत इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परविन अब्दुल मेटकरी यांनी ओबीसी प्रवर्गातून प्रभाग क्रमांक ९ मधून राजे गटाकडून उमेदवारीची मागणी केली आहे.
परविन अब्दुल मेटकरी यांचे भाऊ, आसिफ ऊर्फ बाळासाहेब मेटकरी यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक म्हणून काम केले असून, आपल्या कार्यकाळात अनेक लोकाभिमुख विकासकामे केली आहेत. नागरिकांशी घट्ट नातं निर्माण करून त्यांनी प्रभागात दांडगा जनसंपर्क टिकवून ठेवला आहे.
त्याच जनाधाराचा फायदा परविन मेटकरी यांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या भागात मेटकरी कुटुंबाने केलेल्या कार्यामुळे परविन मेटकरी यांच्या नावाला स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, प्रभाग क्रमांक ९ मध्ये राजे गटाच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव चर्चेत आले आहे.


No comments