प्रभाग क्रमांक ९ मधून मोहन पोतेकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ - प्रभाग क्रमांक ९ हा राजे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या प्रभागात श्री. मोहन पोतेकर हे राजे गटाचे एकनिष्ठ, विश्वासू आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून सर्वत्र परिचित आहेत. प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून विरोधकांमध्येही त्यांची चांगली प्रतिमा आहे.
अतिशय साधेपणा, मनमिळावू स्वभाव आणि लोकांच्या सुख-दुःखात नेहमी पुढे राहणारे व्यक्तिमत्व म्हणून मोहन पोतेकर यांची ओळख आहे. समाजकार्यासाठी त्यांची आवड, लोकांच्या प्रत्येक समस्येवर तत्परतेने धाव घेणारी वृत्ती आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांची मजबूत पकड असल्याने आणि ते नव्या पिढीतील लोकाभिमुख नेतृत्व म्हणून उदयास येत असल्याने, नागरिकांकडून मोहन पोतेकर यांनी या प्रभागातून निवडणूक लढवावी अशी प्रचंड मागणी होत आहे.
“जनतेच्या अपेक्षा आणि विश्वासाला उतरतील असे सक्षम नेतृत्व म्हणजे मोहन पोतेकर,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

No comments