अमीर शेख यांचा राजे गटात प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - माजी खासदार गटाकडून उमेदवारीस इच्छुक असणारे सामाजिक कार्यकर्ते अमिर शेख यांचा प्रवेश विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गटात झाला. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी राजकीय घडामोडींना नवसंजीवनी मिळणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, महेंद्र सूर्यवंशी (बेडके), विशाल पवार आदींची उपस्थिती होती.

No comments