सौ. सपनाताई भोसले यांचा भाजपामध्ये प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - वंचित बहुजन आघाडीच्या फलटण शहर अध्यक्षा सौ. सपनाताई भोसले यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाला फलटण शहरात नवे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया पक्षातील कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
याप्रसंगी माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सुधीर अहिवळे, सौ. अनिता प्रशांत काकडे, सनीभाऊ मोरे, विकी बोके, महेश जगताप, सुनील अहिवळे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments