Breaking News

ज्यांनी चिमणराव कदमांना पाडले त्यांचे पुत्र त्यांच्याच वळचनीला जाऊन बसलेत - झिरपवाडी येथे आ. सचिन पाटील यांची टीका

At Zirapwadi, MLA Sachin Patil criticized Sahyadri Kadam.

फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२६ - माजी आमदार स्व.चिमणराव कदम यांनी सर्वसामान्य लोकांसाठी झिरपवाडी येथे उपजिल्हा रुग्णालयाची सुसज्ज अशी इमारत बांधली या भागातील गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळावीत या उदात्त हेतूने परंतू या तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्याच श्रेय कदम साहेबांना जाईल म्हणून, ते रुग्णालय सुरु होऊ दिले नाही तसेच ज्यांनी निवडणुकीत चिमणराव कदमांना पाडले, अन त्यांचा मुलगा त्यांच्याच वळचनीला जाऊन बसला अशी खंत व्यक्त करत सह्याद्री कदम यांच्यावर नाव न घेता टीका केली.

    झिरपवाडी ता. फलटण येथील जिल्हा परिषदेचे भाजपचे उमेदवार जयकुमार शिंदे तसेच जाधववाडी (फ.) गणातील भाजपचे उमेदवार युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत आमदार सचिन पाटील बोलत होते, यावेळी सचिन रणवरे,विकास नाळे,जालिंदर सस्ते, नगरसेवक राहुलभैय्या निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते तथा जेष्ठ मार्गदर्शक यावेळी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील यांनी सांगितले की, हे सर्व उमेदवार रात्री बेरात्री अगदी गावातील सर्वसामान्य लोकांसाठी झटत असतात, आपण विकासावर निवडणुक लढवणार आहोत, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात लढत आहोत, ते खासदार झाल्यावर अडीच वर्षे कोरोनात गेली, मात्र त्या नंतर दादांनी फार मोठी कामे केली, शेतकरी युवकांचा प्रश्न मार्गी लावले, आपण अनेक वर्षे नीरा देवधर पाण्याची वाट बघत होतो ते स्वप्न दादा पूर्णतःवास नेत आहेत,नीरा देवाधर,धोम बलकवडी साठी आज केंद्र व राज्य सरकार कडून निधी आणला, आज ते काम पूर्ण केले,आता शेतकऱ्यांना वीज बिल नाही,मोटार नाही, कॉक फिरवला की पाणी मिळणार आहे.

विरोधक फक्त फेक नरेटिव्ह पसरवतात, दहा वेळा नारळ फोडतात परंतु कामे होत न्हवती असा टोला लागवत विरोधकांवर टिकेची झोड उठवली.

  फलटण तालुक्यात पानंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आता तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस जाण्यासाठी किंवा शेतात जाण्यासाठी अडचण येणावर नाही असे आमदार सचिन पाटील यांनी सांगत जयकुमार शिंदे व युवराज सस्ते तसेच विकास नाळे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी झिरपवाडी येथील मतदार तसेच युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments