विडणी गणात सचिन अभंग (अध्यक्ष) यांची प्रचारात आघाडी; युवकांचा विजयाचा निर्धार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा), दि. २५ - विडणी गणातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सचिन गजानन अभंग ऊर्फ अध्यक्ष यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, धुळदेव गावात झालेल्या प्रचार दौर्यात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धुळदेव येथे तरुणांसह ज्येष्ठ मार्गदर्शकांचे आशीर्वाद घेऊन संपूर्ण गावात प्रचार करण्यात आला. यावेळी युवक वर्गाने सचिन अभंग यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
पंचायत समिती विडणी गणातील तरुण व तडफदार उमेदवार म्हणून ओळख निर्माण केलेल्या सचिन अभंग यांनी ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले आहे. विडणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी संपूर्ण विडणी गावासह वाडी-वस्तीवर विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करत विकासाची गंगा पोहोचवली आहे.
सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याच कार्याची दखल घेत भाजप व मित्र पक्षांकडून त्यांना विडणी पंचायत समितीची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
सध्या त्यांच्या प्रचारासाठी तरुणांची मोठी फौज सक्रियपणे कार्यरत असून, विडणी गणातील मतदारांनी सचिन अभंग यांचा विजय मोठ्या फरकाने होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

No comments