Breaking News

शिंदे माळ गावाने केला भाजपात प्रवेश, स्मिता गायकवाड यांचा प्रचारात झंझावात

Shinde Mal village joins BJP

फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ - तरडगाव पंचायत समितीच्या गणातील शिंदे माळ येथील संपूर्ण ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीत ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

     तरडगावचे सुपुत्र तब्बल पंधरा वर्षे आमदार म्हणून होते, मात्र आमच्या गावात साधा डीपी बसवू शकले नाहीत, याची मनामध्ये मोठी खंत होती. माजी आमदारांनी शेतकऱ्यांना कधीही सहकार्य केले नाही, अशी खंत व्यक्त करीत त्यांनी आमची फक्त मते घेतली, परंतु आमच्या शिंदे माळ येथील विकासासाठी कधीही सहकार्य केले नसल्याने, आम्ही आज भाजपात प्रवेश करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 पाडेगाव येथे भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ श्री भैरवनाथ मंदिर येथे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, डॉ. नितीन सावंत, युवानेते अभिजित नाईक निंबाळकर, तरडगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सूर्यकांत उर्फ बंडा नाना खरात, पाडेगाव पंचायत समितीचे उमेदवार अमोल खराडे, तरडगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ.स्मिता प्रशांत गायकवाड तसेच तरडगाव पंचक्रोशीतील भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद गटांचे व गणांचे सर्व उमेदवार व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    दरम्यान शिंदे माळ येथील ग्रामस्थांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने तरडगाव पंचायत समितीच्या उमेदवार सौ. स्मिता प्रशांत गायकवाड यांचा विजय सोपा झाला असून भाजपामध्ये जोरदार इन्कमिंग सुरुवात झाली आहे.

No comments