स्व.अजित पवार यांच्या विमान अपघातात तरडगावच्या सुपुत्राचा समावेश ; कर्तव्य बजावताना वीरमरण
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२८ जानेवारी २०२६ - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत झालेल्या भीषण विमान अपघातात तरडगाव (ता. फलटण) येथील सुपुत्र तथा मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सुरक्षारक्षक विदीप दिलीप जाधव (वय ३७) यांचा समावेश असून, कर्तव्य बजावत असतानाच त्यांना वीरमरण आले.
कर्तव्यावर असतानाच घडलेल्या या विमान अपघातात विदीप जाधव यांना वीरमरण आले. ही घटना अत्यंत वेदनादायक असून त्यांच्या अचानक जाण्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय व प्रामाणिक पोलीस कर्मचारी म्हणून विदीप जाधव यांची ओळख होती.
त्यांच्या निधनामुळे तरडगावसह संपूर्ण फलटण तालुक्यात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून विदीप जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. कर्तव्य बजावताना त्यांनी दिलेले बलिदान कायम स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

No comments