Breaking News

जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन) यांच्या विजयासाठी युवावर्ग प्रचाराच्या मैदानात

 फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० जानेवारी २०२६ - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने दोन दिवस दुखवटा असल्यामुळे सर्वच प्रचार यंत्रणा ठप्प झाली होती,दरम्यान आज अगदीच जड अंतःकरणाने पुन्हा कोळकी गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी(फ) गणाचे उमेदवार युवराज सस्ते चेअरमन यांनी झिरपवाडी येथे मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी शेकडो युवा कार्यकर्त्यांनी गाव - वाडी - वस्तीवर जात जयकुमार शिंदे, युवराज सस्ते (चेअरमन)यांच्या विजयाचे आवाहन केले. 

    कोळकी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार जयकुमार शिंदे व जाधववाडी (फ)गणाचे भाजपचे उमेदवार युवाराज सस्ते चेअरमन हे या भागातील सर्व जनतेच्या सुख दुःखात नेहमी सहभागी असतात, या दोघांना मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्याच बरोबर या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ युवक मोठ्या संख्येने प्रचाराची धुरा सांभाळत असून, घराघरात भाजपचा विचार अन विकास तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे व्हिजन घेऊन जात आहेत. लवकरच नाईकबोमवाडी एमआयडीसी येथे  मोठे उद्योग उभारले जाणार असून, या ठिकाणी 80 टक्के स्थानिकांना नोकरी मिळणार असून या माध्यमातून फलटण तालुक्यातील नीरा देवधर तसेच धोम बलकवडी व फलटण तालुक्यातील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यात होणारा विकास नक्कीच जिल्ह्याच्या वाटेवर चालला असून हे दोन्ही उमेदवारांचा विजय हा संकल्प प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवत आहेत.

No comments