पिंपरद येथे सौ.सुषमाताई मोरे व सचिन अभंग (अध्यक्ष) यांचा पिंप्रद येथे होम टू होम प्रचार
ऑस्ट्रेलीयात "सिडणी " व महाराष्ट्रात"विडणी"आज जे विकासाचे मॉडेल आहे, त्या प्रमाणे विकास करण्याची सरपंच सागर अभंग यांची ग्वाही
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० -विडणी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. सुषमाताई अविनाश मोरे तसेच विडणी पंचायत समितीचे उमेदवार सचिन अभंग (अध्यक्ष) यांच्या प्रचारार्थ पिंपरद येथील मरिमाता मंदिर येथे दोन्ही उमेदवारांच्या तसेच विडणी चे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या उमस्थितीत गावातून प्रचार फेरी काढत घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्याचा विकास होत असून, त्याचे अगदी जवळचे उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलीयात "सिडणी " व महाराष्ट्रात"विडणी"आज जे विकासाचे मॉडेल झाले आहे त्याच धर्तीवर पिंपरद चा विकास करण्यासाठी सौ. सुषमाताई अविनाश मोरे व सचिन अभंग अध्यक्ष यांना विजयी करण्यासाठी पिंपरद करांनी या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होत मोठ्या मताधिक्याने विजयाचा संकल्प केला आहे.
दरम्यान आज पिंपरद येथे या दोन्ही उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदान करण्याचे प्रत्यक्ष भेटून आवाहन केले यावेळी शेकडो तरुण या प्रचार यंत्रनेत सहभागी झाले होते.

No comments