फलटणचा विकास करण्याचं दादांचे स्वप्न अपुरे राहिले ; अजितदादांसारखे कणखर नेतृत्व पुन्हा होणे नाही - आ सचिन पाटील
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२९ जानेवारी २०२६ - फलटणच्या विकासासाठी अजित दादांचा वादा पक्का असायचा, शेतकऱ्यांचा हितासाठी नेहमी दादांची सहकार्याची भूमिका असायची, अजितदादांमुळे एका शेतकऱ्याचा मुलाला विधानसभेत जाता आले,फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी मला दादांनी साथ दिली होती, फलटण चांगल झालं पाहिजे यासाठी नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, फलटणचा विकास करण्याचं दादांचे स्वप्न अपुरे राहिले, या महाराष्ट्राचे कणखर असे नेतृत्व आज आपल्यातून हरपले असे नेतृत्व या महाराष्ट्रात न्हवे देशात घडणार नाही शब्दात आपल्या भावना व्यक्त करत आमदार सचिन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

No comments